ST New Buses : दरवर्षी नवीन पाच हजार बस घेणार : प्रताप सरनाईक
Maharashtra Transport : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाकडून दरवर्षी पाच हजार नवीन बसेस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आगामी पाच वर्षांत एसटी महामंडळाकडे २५ हजार बसेस असतील, आणि भविष्यात भाडेतत्त्वावर बसेस घेतल्या जाणार नाहीत
धाराशिव : एसटी महामंडळ दरवर्षी पाच हजार नवीन बस घेणार आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांत महामंडळाकडे २५ हजार बस असतील. यापुढे भाडेतत्त्वावर बस घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.