

Teacher Transfers
sakal
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांच्या अधिकाराचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून शिक्षक संघटनांसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरला होता. अखेर ग्रामविकास विभागाने ४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे या संदर्भात मोठा निर्णय घेत, शिक्षक बदल्या आता जिल्हा परिषद सीईओ यांच्या अखत्यारीतच राहतील, हे स्पष्ट केले आहे.