

छत्रपती संभाजीनगर : शासनाने २००१ पासून लागू केलेले विनाअनुदान धोरण आजही कायम असून त्याचा थेट फटका राज्यातील हजारो शाळा आणि लाखो शिक्षकांना बसत आहे. या धोरणामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवरील अनेक शाळा गेली २४ वर्षे विनाअनुदानितच चालत आहेत.