
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गासह ‘अटल सेतू’ आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी देण्यात आली. यासाठी विविध आरटीओ कार्यालयांनी शुक्रवारी (ता. २२) थेट महामार्गावर चाचणी घेतली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांचा टोल कापला गेल्याने पहिल्याच दिवशी ही यंत्रणा फेल ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.