
छत्रपती संभाजीनगर : ई-चालान व इतर अन्यायकारक नियमांच्या विरोधात वाहतूकदारांनी मंगळवारी (ता. एक) मध्यरात्रीपासून स्वेच्छेने बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात तब्बल ३० संघटनांनी सहभाग घेतल्याने जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.