२ ऑक्टोबरपासून ग्रामरोजगार सहाय्यकांचे बेमुदत ''कामबंद आंदोलन.

२ ऑक्टोबरपासून ग्रामरोजगार सहाय्यकांचे बेमुदत ''कामबंद आंदोलन.
Published on: 
२ ऑक्टोबरपासून ग्रामरोजगार सहाय्यकांचे बेमुदत ''कामबंद आंदोलन.शासन निर्णयाची अंमलबजावणी, मानधन वाढ व विमा संरक्षणासाठी गटविकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन. गंगापूर बातमीदार ता. १ महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संयुक्त कृती समितीच्या राज्यव्यापी आवाहनानुसार प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी २ ऑक्टोबर २०२६ पासून गंगापूर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार आहेत.कृती समितीच्या वतीने ता. १ गुरुवार रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत स्तरावर मनरेगा व विकसित भारत अभियानाची कामे अविरतपणे करूनही मागण्या मान्य न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. ०३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी,दरमहा कायमस्वरूपी सन्मानजनक मानधन द्यावे,मानधन थेट डीबीटीद्वारे बँक खात्यावर वर्ग करावे,अपघाती विमाकवच लागू करावे आणि सेवाशर्तींमध्ये स्थैर्य द्यावे,या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.आंदोलनादरम्यान मस्टर काढणे,हजेरी नोंदवणे,जिओ-टॅगिंग व रोहयोशी संबंधित कोणतीही कामे केली जाणार नाहीत.त्यामुळे मजुरांची होणाऱ्या गैरसोयीस शासन-प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा देण्यात आला;यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष शकील शेख,सचिन थोरात,शिवाजी शिंदे,दत्तू वंजारे,बाळकृष्ण शिरसाठ,प्रदीप जाधव,अरुण जाधव,राहुल जाधव,कैलास नरोडे,सोमनाथ कोकरे,शंकरगुंडाळे,तुपसुंदर,काकासाहेब काकडे,अलीम शेख,भारतकुमार मते,केदार,संतोष गिरी,नंदू जाधव,विजय नरवडे आदी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com