

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: ना कर्णकर्कश डीजे वाजला, ना शहरभर होर्डिंग लागले, तरी उत्साह तसूभरही कमी झाला नाही. उलट सर्वसामान्य नागरिकालाही हेवा वाटेल, अशा धार्मिक कार्यक्रमांसोबतच भरगच्च सामाजिक उपक्रम घेऊन महापुरुषांची जयंती साजरी करता येते, याचा आदर्श सकल जैन समाजाने घालून दिला. मंगळवारी (ता. ३१) शहरात साजरी झालेली भगवान महावीर जयंती नव्या सामाजिक बदलाचे उदाहरणही ठरले.