
छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’चा एप्रिल व मे महिन्याचा १० जूनला तिसरा ड्रॉ काढण्यात आला. यात १६० ग्राहकांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच अशी बक्षिसे मिळाली आहेत. परिमंडळात आतापर्यंतच्या तिन्ही ड्रॉमध्ये ४८० ग्राहकांना बक्षिसे देण्यात आली.