

Mahavitaran Privatization
esakal
संदीप इंदुबाई दिनकर लांडगे
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वीज वितरण व्यवस्था पुन्हा खासगी फ्रँचायजीच्या हाती सोपविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेने महावितरणच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत ‘जीटीएल’ या खासगी कंपनीला देण्यात आलेला वीज वितरणाचा प्रयोग पूर्णपणे अपयशी ठरला होता.