लातूर ः येथील महेश सहकारी बँकेच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रा. सुहास पाचपुते, श्रीकांत मणियार, शिवशरण वरनाळे, मनीष कलंत्री, बँकेचे ज्येष्ठ संचालक जुगल किशोर मालू, गोपाल राठी, गणेश मुंदडा, सरव्यवस्थापक श्रीकांत जाधव, शाखा व्यवस्थापक रमेश अताळे आदी.
महेश सहकारी बँकेचा वर्धापन दिन
----
लातूर, ता. १२ ः येथील पुण्याच्या महेश सहकारी बँकेच्या लातूर शाखेचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. सुहास पाचपुते, व्यापारी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मणियार, महात्मा बसवेश्वर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, उद्योगपती मनीष कलंत्री, आणि छत्रपती राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे अध्यक्ष विजय शेळके यांची उपस्थित होते. तसेच महेश सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक जुगलकिशोर मालू, संचालक गोपाल राठी, संचालक गणेश मुंदडा, सरव्यवस्थापक श्रीकांत जाधव आणि लातूर शाखेचे व्यवस्थापक रमेश अताळे यावेळी उपस्थित होते.
महेश सहकारी बँकेने आतापर्यंत आपल्या सर्व ग्राहकांना जलद, तत्पर आणि पारदर्शक सेवा दिली आहे. या पुढील काळात देखील अशी सेवा देण्यास कटिबद्ध आहे. ग्राहकांनी दाखवलेल्या दृढ विश्वासामुळेच बँक प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे, असे मत यावेळी बँकेच्या संचालकांनी व्यक्त केले. या सोहळ्याला बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार, ठेवीदारांनी उपस्थित राहून बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
---