Accident News: माजलगावजवळ कार-एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यू,

Majalgaon Accident, Car-Bus Collision, Five Dead : बीड जिल्ह्यातील माजलगावजवळ खामगाव-पंढरपूर महामार्गावर कार आणि एसटी बसची धडक होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. हे सर्व तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात होते.
Five people died after a car collided with an MSRTC bus near Shindewadi junction on the Khamgaon-Pandharpur Highway in Beed district.

Five people died after a car collided with an MSRTC bus near Shindewadi junction on the Khamgaon-Pandharpur Highway in Beed district.

esakal

Updated on: 

माजलगाव : राज्य परिवहन महामंडळाची बस (एसटी) आणि कारच्या धडकेत कारमधील पाच जण ठार झाल्याची घटना खामगाव-पंढरपूर महामार्गावर पात्रुड (ता. माजवगाव) गावाजवळील शिंदेवाडी फाट्यावर रविवारी (ता. १८) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हे सर्व तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार माजलागाव-तेलगाव बसवर (एमएच २० २७४०) कार (हुंदाई-एमएच २६ ४२१०) धडकली. या अपघातात ओमकार महादेव गिरी (वय २५), गजानन महादेव नामदास (वय ३८), समर्थ गजानन नामदास (वय १३), सोमनाथ बडे (वय २५) आणि अनिल आचारी (वय ४०, मूळ राजस्थान) यांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com