Majalgaon dam water evaporation rate April
esakal
माजलगाव (बीड) : एप्रिल महिन्याची सुरवात झाली आहे आणि उन्हाच्या वाफा निघू लागल्या आहेत. माजलगाव तालुक्यासह परिसराची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणावर आता निसर्गाची वक्रदृष्टी पडल्याचे चित्र दिसत आहे. आकाशातून आग ओकणारा सूर्य केवळ अंगाची लाहीलाही करत नाहीये, तर धरणातील मौल्यवान साठाही शोषून घेत आहे.