

Stray Dogs
esakal
माजलगाव,: शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न अखेर पालिका प्रशासनाने मार्गी लावला आहे. नगरसेवक शरद यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर नगर परिषदेच्या वतीने मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच दुचाकीस्वारांना होणाऱ्या नाहक त्रासाला कायमचा आळा बसणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.