छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत फक्त ४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात ४३ टक्के पाणीसाठा आहे, तर सर्वांत कमी माजलगाव धरणात आहे.
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, माजलगाव प्रकल्पात सर्वांत कमी १८ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. सीना कोळेगावमध्ये २१, विष्णुपुरीत ३१, मांजरामध्ये ३२, सिद्धेश्वरमध्ये ३३, निम्न दुधनामध्ये ३५, जायकवाडी ४३, निम्न मनारमध्ये ४७, उर्ध्व पेनगंगामध्ये ५१, निम्न तेरणामध्ये ५४; तर येलदरीत ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.