
छत्रपती संभाजीनगर : इंदिरानगर- बायजीपुरा परिसरात गोळी झाडून तरुणाचा खून केल्या प्रकरणात फय्याद बशीर पठाण यास जन्मठेपेसह ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. गोरवाडे यांनी बुधवारी (ता. १३) ठोठावली. दरम्यान, मृताच्या वारसाला योग्य ती नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाला दिले.