आंब्याची आवक मंदावली: केसर, दसेरी, बदामच्या दरात वाढ

हापूसचे दर ५०० रुपये डझनावरून ७०० रुपये झाले आहेत.
Mango
Mango Sakal

आंब्याचा सीझन आता संपत आला. त्यामुळे आवक कमी झाली असून, दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जून हा आंब्याचा शेवटचा महिना असतो. आता आंबे संपणार आहेत. बाजारपेठेत आवक घटल्यामुळे दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हापूसचे दर ५०० रुपये डझनावरून ७०० रुपये झाले आहेत. केसर, दसेरी, बदाम, तोतापरी यांच्या दरातही किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे.

यावर्षी वादळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली. बाजारपेठेत आंब्यांची आवक कमी झाल्यामुळे दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आता आंब्याचा सीझन संपत आल्यामुळे मागणीही वाढली आहे.

मागणी वाढल्यामुळे दरांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे बाजारपेठेत दिसून येत आहे. खवय्यांसाठी आमरसाची चवही आंबट झाली. आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. आमरस सर्वांनाच आवडतो. त्यासोबतच आंब्यापासून आइस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्कशेक असे असंख्य पदार्थ बनवले जातात. यामध्ये आमरस हा अधिक गुणकारी मानला जातो. त्यामुळेच उन्हाळ्यात आमरसाला अधिक मागणी असते.

Mango
Mango Season : नेमका हापूस कुठला? 'हे' कसे ओळखायचे?

परंतु, उन्हाळा संपला असून पावसाळ्याला सुरवात झाली आहे. आता जून महिन्याच्या शेवटपर्यंत आंबे मार्केटमध्ये दिसतील त्यानंतर आंबा दिसणार नाही.

आंबा पूर्वीचे दर सध्याचे दर

हापूस ५०० रुपये डझन ७०० रुपये डझन.

दसेरी ७० ते ८० रुपये किलो १०० ते १२० रुपये किलो.

बदाम ५० ते ८० १०० रुपये किलो.

तोतापरी ६० रुपये किलो ८० रुपये किलो.

केसर १०० रुपये किलो १२० ते १६० रुपये किलो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com