Education News: मुख्याध्यापकपद रिक्त; विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान दोन शाळांचे कामकाज शिक्षकांच्या भरवशावर
ZP Schools: माणिकनगर आणि भवन येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे सर्व कामकाज शिक्षकांच्या भरोशावर चालत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
माणिकनगर : सिल्लोड तालुक्यातील भवन आणि माणिकनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या मुख्याध्यापकांची नियुक्ती न झाल्याने दोन्ही शाळांचे कामकाज शिक्षकांच्या भरवशावर सुरू आहे.