

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर/मनमाड: मुंबई येथील सराफा व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने ९१ लाख ३४ हजार २९५ रुपयांचे दागिने व रोकडची बॅगच रेल्वेतून चोरी गेल्याचा बनाव रचला. मात्र, त्या कर्मचाऱ्याचा एक साथीदार लोहमार्ग पोलिसांच्या हाती लागला अन् सर्व प्रकरणाचा भंडाफोड झाला. मनमाड लोहमार्ग पोलिसांत चार जूनला फिर्याद देणारा कर्मचारीच आरोपी बनला.