Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Manoj Jarange: दौऱ्या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
Manoj Jarange
Manoj Jarangeesakal

Manoj Jarange:

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. अशक्तपणा जाणवत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला.

डॉक्टरकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. ऊन वाढत असल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे जरांगे पाटील रुग्णालयात दाखल आहेत.

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे या मागणीचे नेतृत्व करत आहेत. या मागणीबाबत आता मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आंदोलन सुरू करण्याची गर्जना केली आहे. यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत.

Manoj Jarange
स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

मराठा आंदोलनाबाबत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बीड येथील नारायणगड येथे ८ जून रोजी ही सभा होणार होती. मात्र काही अडचणींमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. या बैठकीच्या तारखेबरोबरच आंदोलनाची तारीखही निश्चित करण्यात आली.

आता 8 जून रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याने मनोज जरांगे यांनी लवकरात लवकर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आंदोलनाची निश्चित तारीख देण्यात आली नसून आता ते 4 जूनपूर्वीच हे आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Manoj Jarange
who is naveen jaihind: अण्णा हजारेंच्या आंदोलनात प्रेम पुढे लग्न अन् घटस्फोट, कोण आहे स्वाती मालीवालचा एक्स पती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com