
Manoj jarange
esakal
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील दोन-तीन दिवसांपासून जरांगे यांना ताप, खोकला, सर्दी आणि अशक्तपणा जाणवत होता. आज त्रास जास्त वाढल्यामुळे त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील दोन-तीन दिवस उपचार चालतील.