

Manoj Jarange Protest
esakal
जालना/ छत्रपती संभाजीनगर: ‘‘माझ्या मागण्या सरकारच्या स्तरावरील आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून फायदा नाही. अधिकाऱ्यांना पुढे करून मंत्री त्यांना बळीचा बकरा बनवत आहेत. सर्व मागण्या मान्य करून उद्याच (ता. दोन) शासन निर्णय काढावा. अंमलबजावणी सुरू करावी. मंत्र्यांनी इथे यावे; तोपर्यंत माघार घेणार नाही,’’ असे मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मंगळवारी (ता. एक) रात्री उशिरा स्पष्ट केले.