Manoj Jarange Ends Hunger Strike After Positive Talks: मराठा आरक्षण मागण्यांवर सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.
वडीगोद्री (जि. जालना): मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने रविवारी रात्री एक वाजता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. उपचारासाठी त्यांना तातडीने संभाजीनगरला हलविण्यात आले.