manoj jarange patil, devendra fadnavis and eknath shinde
sakal
छत्रपती संभाजीनगर, ता. २४ ः आम्हालाही संशय आहे, म्हणूनच आम्ही चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही ऑडिओची फाॅरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लिप बाहेर कोणी आणली? याच्या आडून महायुतीमध्ये भांडणे लावणारा कोण? हे समोर येईल, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी (ता. २४) सांगितले. आता त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.