Manoj Jarange

Manoj Jarange says Maratha protest not over

esakal

Manoj Jarange Protest : आंदोलन संपलेले नाही : जरांगे सातारा गॅझेट लागू केले नाही तर निवडणुकीत दाखवू

Maratha Reservation Movement : मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे की मराठा आरक्षणाचे आंदोलन अद्याप संपलेले नाही. सातारा गॅझेट लागू न केल्यास निवडणुकीत सरकारला धडा शिकवू, असे ते म्हणाले.
Published on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठा आरक्षणाचे आंदोलन अद्याप संपलेले नाही, ते कोणी संपवू शकत नाही, राज्य सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅझेट लागू करावे; अन्यथा येत्या निवडणुकांत सरकारचा धुरळा उडवू. राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी गुरुवारी (ता. चार) सरकारला दिला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com