esakal | Video : जयंत पाटील यांच्या भाषणात मराठा संघटनांची घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आधार मैदानावर 40 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्याची दखल घ्यावी, या मागणीसाठी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

Video : जयंत पाटील यांच्या भाषणात मराठा संघटनांची घोषणाबाजी

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आधार मैदानावर 40 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्याची दखल घ्यावी, या मागणीसाठी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

भाजपने आपल्या कार्यकाळात नुस्त्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीही काम केले नाही. त्यामुळे मागील काळात नगरपालिकांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर टोलेबाजी केली. शनिवारी (ता.७) राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, भाजपाने मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र कामे काहीच केली नाही, आम्ही मात्र बोलत नाही, पण कृती करतो असे आमचे कामकाज सुरू आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी देखील महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवावी, अशी आमची अपेक्षा आहे. असं करत असताना आपल्याला किती जागा मिळतील, हे आताच सांगता येणार नाही मात्र कोणत्या वॉर्डात आपली किती ताकद आहे, त्याठिकाणी प्रभावी उमेदवार कोणता कुणाचा चांगला समज जनसंपर्क आहे अशा उमेदवारांचा विचार केला जाईल. 

हेही वाचा - औरंगाबादेत कोरोनाचा रुग्ण आढळला तर... 

पुढे ते म्हणाले, की ज्याला संधी मिळेल त्याला सर्वांनी मदत करायला हवी. तसेच आघाडीचा धर्म देखील पाळायला हवा लोकांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेऊन ते कसे सुटतील हे जाहीरनाम्यात सांगावे लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला खाते उघडताना आलं नाही, याचा खेद वाटतो. यास काही आमच्या काही स्थानिक पातळीवरच्या चुका आहेत अशी कबुलीही श्री. पाटील यांनी यावेळी दिली. 

पेन्शन वेळेत मिळण्यासाठी काय कराल...
 

loading image