
कन्नड : मुबंई येथील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसापासुन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातुन गेलेल्या लाखो मराठा बांधवासाठी कन्नड तालुक्यातील २६ गावांनी तब्बल २५ क्विंटल बाजरीच्या पिठाच्या भाकरी व चपात्या, हिरव्या मिरचीचा ठेसा, लोणचे घेऊन रविवारी (ता.३१) ला सकाळी १० वाजता आप-आपल्या गावातुन टेम्पो, पिकअप या वाहनांने दोनशे मराठा समाजबांधव मुंबईला घेऊन गेले आहेत. सांयकाळी चार, पाच वाजेच्यासुमारास हे मराठा बांधव पोहचतील अशी माहिती एका समाजबांधवांनी दिली आहे.