Radha Krishna Vikhe Patil
esakal
छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने २ सप्टेंबरला हैदराबाद गॅझेट लागू केले. या जीआरमधून काय मिळाले? तो फसवा आहे का? असा प्रश्न पैठण तालुक्यातील मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांना शुक्रवारी (ता. १७) एका हॉटेलमध्ये घेराव घालत विचारला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीसाठी विखे शहरात आले होते.