Manoj Jarange
esakal
मनोज जरांगे यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यास काँग्रेसचा बीमोड होईल, असा इशारा दिला.
पुढील आठवड्यात दिल्ली दौरा करून सर्वोच्च न्यायालयात जीआरविरोधात याचिका दाखल करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) भूमिका घेत आहेत. मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर काँग्रेस पक्षाचा बीमोड होईल, हे त्यांच्या वरिष्ठांनी लक्षात घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. पुढील आठवड्यात दिल्लीला जाणार असून कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून १९९४ च्या ‘जीआर’ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी मंगळवारी (ता. सात) सांगितले.