Manoj Jarange Patil : ‘..तर पुढील लढा ‘मंडल’विरोधात’

जरांगे म्हणाले की, ‘मंत्री छगन भुजबळ हे मराठा, धनगर समाजांत वाद निर्माण करीत आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal
Updated on

छ्त्रपती संभाजीनगर - ‘शासनाने आम्हाला १३ जुलैपर्यंतचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत विश्वास ठेवू. जर आमच्या नोंदी रद्द झाल्या तर इथून पुढचा लढा मंडल आयोग रद्द करण्यासाठी असेल,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी शनिवारी दिला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जरांगे म्हणाले की, ‘मंत्री छगन भुजबळ हे मराठा, धनगर समाजांत वाद निर्माण करीत आहेत. आम्ही कुणाचे आरक्षण ओरबाडत नाही. आमच्या हक्काचे मागत आहोत.

त्यामुळे सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही. केलाच तर तो सरकारला महागात पडेल. समाज माझी पाठराखण करायला खंबीर आहे. मी समाजाच्या कोट्यवधी लेकरांसाठी लढतो आहे. घाबरून समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाज एकत्र आला त्याचे मतात रूपांतर झाले त्यामुळे यांचे पोट दुखत आहे.’’

सर्वपक्षीय मराठा नेत्यांवर नाराजी

मनोज जरांगे यांनी सर्वपक्षीय मराठा नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली. आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून, ओबीसीतून आरक्षण घेणारच. तसेच दिलेल्या मुदतीपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. आमची इच्छा नाही; पण कुणी अंगावर आले तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.