
कन्नड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुबंईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसापासुन सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मंगळवारी (ता.२) रोजी सांयकाळी सर्वात मोठे यश मिळाल्याने कन्नड शहरासह तालुक्यातील गावा-गावात गुलाल उधळुन, फटाके फोडुन, एकमेकांना लांडु, पेढे भरवत, डिजे, ढोल, ताशे वाजवत मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाचा विजयीउत्सव मोठ्या जल्लोष साजरा केला. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच तालुक्यातील औराळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास समाजबांधवांनी पुष्पहार अर्पण केला.