

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहर. या शहरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तुसंग्रहालये आहेत. पुरातत्त्व खाते, महापालिका, विद्यापीठ यांची संग्रहालये तर आहेतच. पण, शहरातील काही हौशी मंडळींनीही नानाविध गोष्टींचा संग्रह करीत खासगी छोटेखानी संग्रहालये बनवली. त्यातील काही वस्तुसंग्रहालयांची ओळख करून देणारी ही मालिका. उन्हाळ्याच्या सुटीत बच्चेकंपनीला आणि मोठ्यांनाही हे ऐतिहासिक खजिने वेगळा आनंद देतील.