esakal | ‘मराठी भाषा, साहित्याचा मराठवाडा आधारवड’
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Language

‘मराठी भाषा, साहित्याचा मराठवाडा आधारवड’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ‘‘मराठी भाषेतील पहिली साहित्यकृती मराठवाड्यात निर्माण झाली. अनेक गोष्टींची सुरुवात मराठवाड्यातून झाली. मराठी भाषा, संस्कृती व साहित्याचा आधारवड हा मराठवाडा आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.

हेही वाचा: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यासाठी रस्ताच नाही;पाहा व्हिडिओ

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिसरात झाले. उद्‍घाटनाला माजी महापौर नंदकुमार घोडेले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, जिथे कमी तिथे आम्ही’ या म्हणी प्रमाणात साहित्य संमलेनासाठी येणारा खर्च उचलणार आहे.

loading image
go to top