

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीगर: एकीकडे मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे महापालिकेच्या मराठी माध्यम आणि राज्य बोर्डाच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले. महापालिकेच्या प्रभाग २९ मधील तीन आणि प्रभाग ५ मधील एक अशा एकूण चार मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून त्याऐवजी इंग्रजी माध्यम आणि सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. या संदर्भातील प्रस्ताव सोमवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.