.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मोठ्या धरणांनी गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची टक्केवारी ओलांडली आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये २७ ऑगस्ट रोजी ४३.०६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता, तर यावर्षी मंगळवारी (ता. २७) पर्यंत हा साठा ४९.०६ टक्के झाला आहे.