Marathwada Farmers: ८३ लाखांवर शेतकऱ्यांना मदत; आतापर्यंत ७० टक्के वाटप, अद्यापही चार लाखांवर अतिवृष्टीबाधित ई-केवायसीअभावी वंचित
District-Wise Compensation Shows Major Crop Losses: मराठवाड्यातील ८२.९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ६,१२७ कोटी मदत जमा. ई-केवायसी अपूर्ण असल्याने ४ लाख शेतकरी अजूनही मदतीपासून दूर.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ३२ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले होते. यामध्ये एक कोटी सहा लाख ४५ हजार तीन शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले होते.