esakal | Corona Updates:मराठवाड्यात नवे साडेसात हजार कोरोना रुग्ण

बोलून बातमी शोधा

Corona Updates: मराठवाड्यात नवे साडेसात हजार कोरोना रुग्ण
Corona Updates: मराठवाड्यात नवे साडेसात हजार कोरोना रुग्ण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारी (ता. १९) दिवसभरात ७ हजार ४५७ कोरोना रुग्णांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; औरंगाबाद १४९३, लातूर १४२१, नांदेड १३७५, बीड ११२१, उस्मानाबाद ६६२, परभणी ५७३, जालना ५२१, हिंगोली २९१.

मराठवाड्यात ११३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातुरमधील २८, औरंगाबाद २४, परभणी १६, नांदेड १५, उस्मानाबाद १०, हिंगोली- बीड प्रत्येकी ९, जालन्यातील दोघांचा समावेश आहे.

घाटी रुग्णालयात १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात सिल्लोडमधील ५५ वर्षीय महिला, बोरसर, वैजापूर येथील ६५ वर्षीय महिला, वाळूजमधील ६१ वर्षीय पुरुष, वैजापुरातील ८५ वर्षीय पुरुष, आमखेडा येथील ५९ वर्षीय महिला, रेल्वे स्टेशन भागातील ७० वर्षीय महिला, नंदनवन कॉलनीतील ५२ वर्षीय महिला, चितेगाव (ता. पैठण) येथील ६९ वर्षीय पुरुष, अयोध्यानगरातील ६५ वर्षीय पुरुष, आरतीनगरातील (पिसादेवी रोड) २१ वर्षीय तरुण, जयभवानीनगरातील ५० वर्षीय महिला, भगूर वैजापूर येथील ४० वर्षीय पुरुष, राधास्वामी कॉलनीतील ५८ वर्षीय पुरुष, गाजीवाडा (ता. पैठण) येथील ७० वर्षीय महिला, बोरसर वैजापूर येथील ४२ वर्षीय महिला, हडको येथील ५५ वर्षीय महिला, हडको एन-अकरामधील ७५ वर्षीय महिला, गारखेड्यातील ७३ वर्षीय वर्षीय महिला, गंगापूरमधील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. वाळूज एमआयडीसी भागातील ३७ वर्षीय पुरुष, खंडाळा (ता. वैजापूर) येथील ५२ वर्षीय पुरुष, शानोशौकत कॉलनीतील ६९ वर्षीय वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात तर वाळूज एमआयडीसी भागातील ६८ वर्षीय पुरुष, जटवाडा रोड हर्सुल येथील ७५ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी दीड हजार रुग्ण बरे : औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १४९३ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ५२६ तर ग्रामीण भागातील ९६७ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ४९३ वर पोचली आहे. बरे झालेल्या आणखी १ हजार ५७८ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ९२ हजार ६८३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या २ हजार १८० वर गेली आहे.