esakal | कोरोनाचे नवे सात हजार ७३७ रुग्ण, मराठवाड्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे नवे सात हजार ७३७ रुग्ण,मराठवाड्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू

कोरोनाचे नवे सात हजार ७३७ रुग्ण,मराठवाड्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी (ता.१८) दिवसभरात सात हजार ७३७ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; लातूर १८१३, औरंगाबाद १४२९, नांदेड १२८७, बीड ११४५, जालना ९०९, परभणी ४८९, उस्मानाबाद ४७७, हिंगोली १८८. मराठवाड्यात रविवारी १३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये गेल्या काही तासांत ५०, नांदेड २७, औरंगाबाद २२, उस्मानाबाद १६, परभणी आठ, जालना-हिंगोलीत प्रत्येकी सात जणांचा समावेश आहे.

घाटी रुग्णालयात २४ तासांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात घाटीत गंगापूर येथील ६० वर्षीय महिला, सावरकरनगर येथील ६० वर्षीय पुरुष, रोहिला (ता. कन्नड) येथील ३५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ७० वर्षीय महिला, लहूपूर येथील ७९ वर्षीय पुरुष, सावखेडा (ता. वैजापूर) येथील ६५ वर्षीय पुरुष, मारुतीनगर हर्सूल येथील ५८ वर्षीय पुरुष, गोधेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, लिहाखेडी (ता. सिल्लोड) येथील ३५ वर्षीय पुरुष, माळी घोगरगाव येथील ५७ वर्षीय महिला, पेठेनगर येथील ६१ वर्षीय महिला, स्नेहनगर, सिल्लोड, येथील ५६ वर्षीय महिला, आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलगी, जाधववाडी येथील ६० वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, बजाजनगर येथील ३२ वर्षीय महिला, सेवापूर (ता. कन्नड) येथील ३१ वर्षीय पुरुष, टाकळी जिवरग (ता. सिल्लोड) येथील ५० वर्षीय पुरुष, आदगाव (ता कन्नड) येथील ४६ वर्षीय पुरुष, व्यंकटेशनगर येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी १३७४ रुग्ण बरे : औरंगाबाद जिल्ह्यात बरे झालेल्या १३७४ जणांना रविवारी सुटी देण्यात आली. नव्याने १४२९ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ६५६ तर ग्रामीण भागातील ७७४ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या एक लाख नऊ हजारावर पोचली असून आतापर्यंत ९१ हजार १०५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ७३९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आणखी २२ जणंचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार १५६ जणांचा मृत्यू झाला आहे.