
Corona Updates : मराठवाड्यात नवे साडेतीन हजार कोरोनाबाधित, १०३ जणांचा मृत्यू
औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) सोमवारी (ता. १७) दिवसभरात ३ हजार ४१५ कोरोना (Corona) रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड (Beed) १११८, उस्मानाबाद (Osmanabad) ५४७, लातूर (Latur) ४२६, औरंगाबाद (Aurangabad) ४२३, जालना (Jalna) ४०५, परभणी (Parbhani) २८०, नांदेड (Nanded) १५४, हिंगोली (Hingoli) ६२. उपचारादरम्यान १०३ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातुरमध्ये ३४, औरंगाबाद २६, नांदेड १२, परभणी १०, बीड-उस्मानाबादेत प्रत्येकी ७, जालना ६, हिंगोलीतील एकाचा समावेश आहे. (Marathwada Corona Updates New Three Thousand Covid Cases Reported)
औरंगाबादेत आणखी २६ जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत २ हजार ९४८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सिल्लोड येथील पुरुष (वय ४३), भागणी (ता. गंगापूर) येथील पुरुष (६०), कोबापूर (ता. गंगापूर) येथील महिला (४२), सिल्लोड येथील पुरुष (६९), कन्नड येथील पुरुष (८६), हडको एन-१३ येथील पुरुष (५४), विद्यापीठ भागातील पुरुष (५२), संग्रामनगरातील पुरुष (४६), करकीन (ता. पैठण) येथील महिला (४५), बालाजी विहार (ता. पैठण) येथील महिला (६१), खंडाळा (जि. औरंगाबाद) येथील महिला (४४), मोहरा (ता. कन्नड) येथील पुरुष (५८), हर्सूल येथील महिला (५०) , गंगापूर येथील पुरुष (६१), कोपरगाव येथील महिलेचा (५५) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात दोन तर खासगी रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबादेत ४२३ बाधित, ६११ रुग्ण बरे
औरंगाबाद जिल्ह्यात नवे ४२३ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील १७२, ग्रामीण भागातील २५१ रुग्णांचा समावेश आहे. रुग्णसंख्या १ लाख ३७ हजार ४६७ झाली. बरे झालेल्या आणखी ६११ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १३०, ग्रामीण भागातील ४८१ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख २८ हजार १४३ रुग्ण बरे झाले आहेत.सध्या ६ हजार ३४६ जणांवर उपचार सुरू आहेत.