esakal | दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली
sakal

बोलून बातमी शोधा

corona updates

दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाने मोठे थैमान मांडले होते. रोजच्या रुग्णवाढीसोबत मृत्यूचे आकडेही उच्चांकी वाढत होते. पण प्रतिदिन रुग्णवाढ बऱ्याच दिवसांनंतर सात हजारांच्या आत आली आहे. मागील २४ तासात मराठवाड्यात ६ हजार ३९३ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यांचा विचार केला तर, बीड- १ हजार ८६, लातूर- १ हजार ६९, औरंगाबाद- १ हजाह ३९, नांदेड- ८७३, उस्मानाबाद -७२०, परभणी- ६८४, जालना- ६८३, हिंगोली- २३९ वाढली आहे.

उपचारादरम्यान आणखी १४६ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यात औरंगाबादेत २८, परभणी २७, लातूर-नांदेडमध्ये प्रत्येकी २४, उस्मानाबाद १७, जालना ११, बीड ८, हिंगोलीतील सात जणांचा समावेश आहे.

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सातारा परिसरातील पुरुष (वय ६८), न्यू पहाडसिंगपुऱ्यातील महिला (६५), लेबर कॉलनीतील पुरुष (४२), सिल्लोडच्या शिक्षक कॉलनीतील पुरुष (६२), कुबेर गेवराईतील पुरुष (७५) भावसिंगपुऱ्यातील महिला (२६), पडेगावातील पुरुष (३९), इटखेडा येथील पुरुष (९८), कांगोनी (ता. वैजापूर) येथील पुरुष (४८), टीव्ही सेंटर भागातील पुरुष (७५), वांजरगाव (ता. वैजापूर) येथील पुरुष (९२), पिंपरीराजा येथील महिला (६२), माळीवडगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (७५), सैनिक तांडा (ता. कन्नड) येथील महिला (५०), वैजापूर येथील पुरुष (४८), चौका (ता. फुलंब्री) येथील महिला (५५), हर्सूल येथील महिला (७०), घारडोन (जि. औरंगाबाद) येथील महिला (७५), धामनगाव (ता. वैजापूर) येथील महिला (६०), सिडको एन - ८ भागातील पुरुषाचा (७५) समावेश आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत दिवसभरात रेकॉर्डब्रेक लसीकरण, साडेअकरा हजार जणांनी घेतली लस

लिंबेजळगाव येथील पुरुष (६५), कन्नड येथील (५४), भावसिंगपुऱ्यातील पुरुषाचा (४५) जिल्हा रुग्णालयात तर कन्नड येथील महिला (५६), बिडकीन येथील पुरुष (५८), भगतसिंगनगरातील (हर्सूल) पुरुष (८४), भानुदासनगरातील पुरुष (६२), पडेगावातील व्यक्तीचा (७२) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त-

औरंगाबादेत कोरोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांचे प्रमाण जास्त आहे. ही सुखद बाब असून जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, त्यांना साहाय्य करणाऱ्या सर्व यंत्रणांचे हे यश आहे. जिल्ह्यात आज १ हजार ३९ रुग्णांची भर पडली तर बरे झालेल्या आणखी १ हजार ६५१ जणांना सुटी देण्यात आली. बरे झालेल्यांत शहरातील ७१८, ग्रामीण भागातील ९३३ जणांचा समावेश आहे. रुग्णसंख्या १ लाख १९६०८ झाली असून आजपर्यंत १ लाख ४२३२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १२ हजार ९७५ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी २८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत २ हजार ४०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

loading image