३९ उमेदवारांचे
डिपाॅझिट जप्त
--
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ४१ उमेदवार रिंगणात उतरले होते. उमेदवारांच्या विजयासाठी निश्चित करण्यात आलेल्या कोट्याच्या १/६ (एक षष्टांक) किंवा एक षष्टांकाच्या कमी मते घेणाऱ्या उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त करण्यात आले. त्यानुसार, ११ हजार ७५९ पेक्षा कमी मते घेणाऱ्या ३९ उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त करण्यात आले. तीन उमेदवारांना एक षष्टांकापेक्षा अधिक मते मिळाल्याने त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले नाही.
जप्त झालेल्यांमध्ये शिवसेना उबाठाचे दिलीप घुगे यांच्यासह ३९ उमेदवारांचा समावेश आहे. डाॅ. प्रतापसिंह पाटील, सतीश चव्हाण आणि अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांचेच डिपाॅझिट वाचले आहे.
--------------
‘गृहीत धरणे नडले’
--
सतीश चव्हाण यांनी मराठवाड्यातील मतदारांना गृहीत धरले होते. जेव्हा उमेदवार गृहीत धरतो, तेव्हा मतदार मतदानाची वाटच बघत असतात. त्या दिवशी ते उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करतात. चव्हाणांचाही मतदारांनी असाच करेक्ट कार्यक्रम केला आहे. मुळात सतीश चव्हाण माझे विरोधक किंवा स्पर्धक नव्हतेच. मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होतो. ही जागा पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जाहीर केली होती. जेव्हा एखादी जागा ते फायनल करतात तेव्हा ती १०० टक्के निवडूनच येते’’, अशी प्रतिक्रिया डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.