esakal | Aurangabad Rain : शाळा पाण्यात, पुस्तके गाळात!
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Rain : शाळा पाण्यात, पुस्तके गाळात!

Aurangabad Rain : शाळा पाण्यात, पुस्तके गाळात!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शाळांमध्ये सोमवारी एकीकडे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत होता तर दुसरीकडे ढगफुटीसदृष्‍य पावसामुळे गोपाळपूर येथील जि.प. शाळेला पुराच्या पाण्याने वेढलेले होते. त्यामुळे शाळेत पाणी साचून शैक्षणिक साहित्य, पुस्तकांचे मोठे नुकसान झाले. परीणामी, विद्यार्थी शाळेत जाण्यास मुकले होते.

पुरामुळे शाळेतील शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले; तर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी आणलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. शाळेला संरक्षक भींत नसल्यामुळे पुराचे पाणी शाळेत शिरले. त्यामुळे प्रत्येक वर्गात तीन फूटापर्यंत, तर शाळेच्या मैदानावर सात फूटापर्यंत पाणी साठले होते. यात पाठ्यपुस्तके, वह्या, बेंच, खुर्च्या, फर्निचर वाहून गेले. वर्गातील फरशा उखडल्या, शाळेतील संगणक, पाणी स्वच्छतेचे प्युरीफायर, बॅटरी, इनव्हर्टर, विद्यार्थ्यांची खेळण्यांचे मोठे नुकसान झाले. या पुरासोबत वाहून आलेला गाळ, कचरा, भंगार साहित्याचा शाळेच्या आवारात खच पडला. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेवून मदत करावी, अशी मागणी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.

पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शाळा भरविण्यात आली नाही. याबाबत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी पंचनामा केला आहे. याबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना सादर केला आहे.

-अलका शुक्ला, मुख्याध्यापक

loading image
go to top