

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: ‘म्हागल्या वर्षी पौसानी धानं सगळी न्हेली, माती बी ऱ्हायली नोती, पण औंदा उरल्या सुरल्या काळ्या मायची वटी (ओटी) भऱ्हायला सुदा पौस पडंना झालाय, पौसाची वाट बगू बगू, डोळ्यातलं पाणी आटायलंय...!’ पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या ६३ वर्षांच्या सुदामती नरवडे या महिला शेतकरी आजीने ‘सकाळ’शी बोलताना आपली भावना व्यक्त केली.