मराठवाड्यातील बंद कारखान्यांबाबत सरकार उदासीन : राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 राजू शेट्टी

मराठवाड्यातील बंद कारखान्यांबाबत सरकार उदासीन : राजू शेट्टी

sakal_logo
By
पांडुरंग उगले

माजलगाव : मराठवाड्यातील अनेक साखर कारखाने बंद असून ते सुरू करण्याबाबत सरकार उदासीन आहे. बंद कारखान्यांमुळेच मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी अनेक कारखान्यांची क्षमता वाढलेली असल्याने हा प्रश्न निर्माण होणार नाही. एकरकमी एफआरपी देण्यासाठी मराठवाड्यातील कारखानदार, शेतकऱ्यांना अतिरिक्त उसाची भीती घालत असले तरी आम्ही ती घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

माजलगाव येथे रयत सोसायटीला सदिच्छा भेट दिली असता राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते. त्यांच्यासोबत अमोल हिप्परगे, कुलदीप करपे, अमित नाटकर उपस्थित होते. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिली नाही तर वेळप्रसंगी साखर कारखान्यांना जाणारा ऊस रोखण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बंद कारखाने सुरू करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला; परंतु दुर्दैवाने मराठवाड्यातील बंद कारखाने सुरू करण्यासाठी कारखानदारांसह सरकारही प्रयत्न करीत नाही.

हेही वाचा: विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

शेतकऱ्यांचे हे कारखाने सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांची भेट घेणार आहोत. बंद कारखाने ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांना सुरू करायला जमत नसेल तर, ते भाड्याने देण्याबाबत स्वाभिमानी संघटना आग्रही आहे असेही ते म्हणाले.

जयंत पाटील, बाळासाहेब पाटलांमुळे आंदोलन चिघळले

एकरकमी एफआरपीच्या प्रश्नावर पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांमुळेच चिघळले आहे. अजूनही वेळ गेलेली नसून एकरकमी एफआरपी जाहीर करावी अन्यथा यापेक्षाही मोठा भडका उडेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

loading image
go to top