ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न; परवानगी मिळाली | Julian Assange | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Julian Assange

विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज तुरुंगात करणार लग्न

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

लंडन : विकिलिक्सचे (Wikileaks) संस्थापक ज्युलियन असांज (Julian Assange) यांना त्यांची तुरुंगातील साथीदार स्टेला मॉरिससोबत (Stella Moris) लग्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. असांज यांना 2019 पासून लंडनच्या उच्च सुरक्षा असलेल्या बेलमार्श तुरुंगात ठेवण्यात आले आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली तो स्वत:चे प्रत्यार्पण करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नाशी ते लढा देत आहेत.

लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली स्वीडनला प्रत्यार्पण होऊ नये म्हणून लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात असांजच्या सात वर्षांचे वास्तव्य होते. त्या दरम्यान आसांज आणि स्टेला मॉरिस या दोघांमध्ये संबंध सुरु झाले होते. असांज आणि दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले वकील मॉरिस यांना गॅब्रिएल (०४) आणि मॅक्स (०२) अशी दोन मुले आहेत.

मॉरिस यांनी सांगीतले की, "मला परवानगी मिळाल्याने मला दिलासा मिळाला आहे आणि मला आशा आहे की आमच्या लग्नात यापुढे कोणताही हस्तक्षेप होणार नाही." जानेवारीमध्ये एका न्यायाधीशाने असांजच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेची विनंती नाकारली होती. असांज आणि मॉरिस यांनी एप्रिल 2020 मध्ये त्यांचे नाते सार्वजनिक केले आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडे लग्नाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.

हेही वाचा: स्वस्तात मस्त असलेले Redmi चे टॉप 5 स्मार्टफोन्स, पाहा यादी

त्याने तुरुंगाचे गव्हर्नर आणि न्याय विभागाचे मंत्री डॉमिनिक राब यांच्यावर कायदेशीर कारवाईची धमकी देत त्यांच्यावर लग्न थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तुरुंगाकडून सांगण्यात आले की, "इतर कैद्यांप्रमाणे असांजचा अर्जही तुरुंगाच्या गव्हर्नरने स्वीकारला आणि त्यावर नेहमीच्या पद्धतीने विचार केला," दरम्यान लग्नासाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही.

ज्युलियन असांज हे ऑस्ट्रिलियाचे नागरिक आहेत, दरम्यान त्यांना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे उघड केल्याचा तसेच हेरगिरी केल्याचे आरोप आहेत. त्यांनी देशाच्या संरक्षण दस्तावेज प्रकाशित केले होते. तसेच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप देखील आहेत.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

loading image
go to top