Marathwada Farmers : मराठवाड्यात दोन घटनांत दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन
Farm Loan Burden : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील तळनेर येथील शेतकरी कडूबा एंडोले यांनी कर्जबाजारीपणामुळे व मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून आत्महत्या केली. लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले.
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील तळनेर येथील अल्पभूधारक शेतकरी कडूबा एंडोले (वय ४६) यांनी आर्थिक विवंचनेला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.३०) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.