Chhatrapati Sambhajinagar: संलग्नीकरणाची शुल्कवाढ स्थगित; चार सदस्यीय समिती स्थापन, पुढील बैठकीत होणार निर्णय

Committee Formed for Review: संलग्नीकरण शुल्कवाढीवर आक्षेप घेतल्याने विद्यापीठाने हा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. समिती स्थापन करून पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: कायम संलग्नीकरण झालेल्या महाविद्यालयांना आकारण्यात येणारे शुल्क व विस्तारीकरण शुल्क वाढीवर आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २४) आक्षेप नोंदवले. त्याचे पडसाद मंगळवारी व्यवस्थापन परिषदेत उमटले. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून माजी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यी समितीच्या अहवालानंतर यावर पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.२४) झाली. प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह १८ सदस्य उपस्थित होते. बैठकीत १५ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com