
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात रॅंगिगचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घ्या. विभागप्रमुखांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडून हमीपत्र भरून घ्यावे; तसेच अँटी रॅगिंग स्क्वॉडने वसतिगृह, कँटीन आदी ठिकाणी वारंवार भेटी देण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी शनिवारी (ता. दोन) दिले.