
Marathwada University
Sakal
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय होत आहे. सोमवार (ता. आठ) ते ३० सप्टेंबर या काळात जिल्हा युवक महोत्सव होणार आहेत. सोमवारी (ता. आठ) धाराशिव जिल्ह्यात अणदूर (ता. तुळजापूर) येथील जवाहर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवा महोत्सवाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते उद्घाटन होईल.