
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय दिवाळीपूर्वी होणार आहे. यजमानपदासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.