

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. ३१) जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांनी कोट्यवधी रुपयांचे हिशेब चुकते केले. शासनाकडून प्राप्त निधी अखर्चित राहू नये, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत बिले सादर करण्याची लगबग सुरू होती. त्यामुळे हा ताण जिल्हा कोषागार कार्यालयावर आल्याने हे कामकाज मध्यरात्री १२ पर्यंत सुरू होते. शेवटच्या दिवशी कोषागार कार्यालयातून ५५० पेक्षा अधिक बिले सादर झाल्यानंतर त्या त्या विभागाला निधी अदा करण्यात आल्याचे कार्यालयातर्फे सांगण्यात आले.